Breaking News

के.के रेंज प्रकरणी सुजित झावरे ६ मार्चला संरक्षण मंञ्यांना भेटणार


पारनेर/ प्रतिनिधी /- तालुक्यासह नगर राहुरी ही गावे के के रेंजमधुन वगळावीत, या मागणी साठी जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे कृषीमंञी शरद पवार यांच्या माध्यमातुन संरक्षणमंञी निर्मला सितारमण यांची भेट घेणार आहेत. अशी माहीती पञकार परीषदेत दिली.

दि. २७ फेब्रुवारी रोजी का. वसंतराव झावरे यांच्या पुण्यस्मरण निमित्त वासुंदे येथे शेतकरी मेळाव्याला कृषीमंञी शरद पवार आले होते. त्यावेळी सुजित झावरे यांनी निवेदन देउन के के रेंज प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली. त्यानुसार झावरे यांनी गुरुवारी शरद पवार यांना स्मरणपञ दिले. ६ मार्चला सुजित झावरे, शरद पवार यांना भेटुन तोडगा काढणार आहेत. तसेच दुसरीकडे पारनेर नगर राहुरी तालुक्यातील जमीन घेण्यासाठी लष्कराला मोजमाप करण्याचे आदेश दिल्याने व रहिवाश्यांमध्ये धास्तीचे व भितीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे १९९४ नंतर पुन्हा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या अगोदर कै वसंतराव झावरे यांनी शरद पवार सरक्षणमंञी असताना पारनेर राहुरी व नगर तालुक्यातील गावे के के रेंज मधुन वगळण्याची मागणी ढवळपुरी, वनकुटा, पळशी या गावातील सरपंचाना भेटुन केली होती. त्यामुळे या प्रक्रियेला काही काळ दिलासा मिळाला होता. आता मात्र पुन्हा एकदा या भुसंपादन प्रक्रियेला वेग आला असुन, गेल्या आठवड्यात हेमलपाडा व सुतारवाडी परिसरात तोफगोळ्यांचे अवशेष दिसुन आले होते. त्यामुळे के.के रेंज विषयी नागरिकांत भिती निर्माण झाली आहे. या प्रश्नी योग्य तोडगा न निघाल्यास या गावांना विस्थापित व्हावे लागणार आहे. त्यामुळे केन्द्रीय कृषिमंञी शरद पवार यांची भेट घेऊन तोडगा काढणार असल्याचे डॉ. सुजित झावरे यांनी पञकार परिषदेत सांगीतले आहे.