नाथमंदिरात 'श्रीखंड्या'चा रांजण भरू लागला नाथषष्ठी यात्रोत्सवाला प्रारंभ
जाणा-या नाथषष्ठी यात्रेचा मुख्य महोत्सव ७ ते ९ मार्च या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे.तुकाराम बिजेला दरवषीर् संत एकनाथ महाराज यांच्या वाड्यात असलेल्या ऐतिहासिक रांजणाची नाथ वंशजांच्या हस्ते विधिवत पूजन करून नाथ षष्ठी यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली. या वर्षी दुपारी एक वाजता नाथांच्या वाड्यात असलेल्या'श्रीखंड्या'रांजण भरायला सुरुवात झाली. एकनाथांच्या काळापासून आजही सुस्थितीत असलेल्या त्यांच्या वाड्यातील या रांजणाबद्दल आख्यायिका आहे. पांडुरंगांनी नाथांच्या घरी बारा वर्षे र्श्रीखंड्याच्या रूपाने वास्तव्य केले होते. हा श्रीखंड्या गोदावरीतून पाणी आणून ते याच रांजणात भरत असे'एकवीस फूट खोल व नऊ फूट रुंद संपूर्ण दगडी बांधकाम असलेले हे रांजण आजही सुस्थितीत आहे. तुकाराम बिजेच्या दिवशी या रांजणाची विधिवत पूजा करून रांजण भरायला सुरुवात करण्यात येते.