अनधिकृत रेती उत्खनन प्रकरणी चौघाविरुद्ध गुन्हा दाखल : 22 ब्रास रेतीसाठा जप्त
ठाणे : प्रतिनिधी ;- दिवसाढवळ्या अनधिकृतपणे रेती उत्खननप्रकरणी ठाणे तहसीलदारांनी धडक करवाई केली आहे.या कारवाईत डायघर येथील मौजे डावले आणि मुंब्रा येथील मौजे साबेगाव आणि रेतीबंदर येथे एकूण 12 रेतीच्या कुंड्या नष्ट करून 22 ब्रास रेतीसाठा जप्त केला.याप्रकरणी,मुंब्रा आणि डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनधिकृतपणे रेती उत्खनन सुरु असल्याचे वृत्त प्रसारित होताच ठाणे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पोलिसांच्या सहकार्याने बुधवारी डायघर पोलीस ठाण्याच्या ह्द्दीत मौजे डावले येथे कारवाई करून एकूण 5 कुंड्या नष्ट केल्या.या कारवाईत एकूण 22 ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला.याप्रकरणी,डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.तर,मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेतीबंदर आणि साबेगाव येथे छापा टाकून 7 रेतीच्या कुंड्या नष्ट करून सामुग्री जप्त केली.तसेच,मुंब्रा पोलीस ठाण्यात समीर पैठणकर,जयेश पाटील,दिनकर व दशरथ राठोड यांच्यावर अनधिकृत रेती उत्खनन प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले.