Breaking News

आरोग्यदूत रामेश्‍वर नाईक यांना संतेश्‍वर पुरस्कार जाहीर

जळगाव, दि. 05, नोव्हेंबर - गोरगरीब जनतेला मोफत आरोग्य सेवा तसेच गरज भासल्यास मोफत शस्ञक्रीया करून त्यांना रोगमुक्त करून घरापर्यंत सोडणारे पुढील क ाळातत्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सातत्याने कार्यरत राहणारे जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र आरोग्यदूत रामेश्‍वर नाईक यांना नवी दिल्ली येथे अखिल भारतीय संत ईश्‍वर सेवा ह्या  प्रथम पुरस्काराने केंद्रीय मंत्री श्रीमती उमा भारती यांच्या हस्ते सन्मानीत केले जात आहे.
यावेळी राष्ट्रीय सेवा संघाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय सेवा भारती व संत ईश्‍वर फाउँडेशन यांच्यावतीने राष्ट्रीय सेवा प्रथम पुरस्कार आरोग्यदूत श्री. रामेश्‍वर नाईक यांना देण्यात येत आहे. पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रुपये रोख 24  कॅरेट सोन्याचा वापर केलेले स्मृतीचिन्हाचा समावेश आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यामार्फत राज्यात सुरू असलेले वैद्यकीय शिबीराचे कार्य गोर- गरीब जनते पर्यंत  आरोग्य सुविधांच्या माध्यमातून पोहोविण्याचे कार्य श्री.नाईक हे करित आहे. महाजन यांच्या माध्यमातून सुमारे 2 लाखाच्या वर शस्रक्रिया व 16 लाखा वर रुग्णांची तपासणी रामेश्‍वर  नाईक यांनी केली आहे.. या अगोदर ते आचार्य अविनाशी पुरस्कार चे मानकरी ठरले होते.
या पुरस्कारा बद्दल प्रतिक्रीया देतांना श्री.नाईक म्हणाले की, हा गौरव माझा नसून हा गिरीश महाजन यांचा व माझ्या सोबत कार्य करणा-या सर्व कार्यकर्त्यांचा आहे. श्री. नाईक यांना  यापूर्वी अनेक पुरस्कार जाहीर झाले होते. परंतु मी पुरस्कारासाठी काम करीत नाही असेही नाईक यांनी यावेळी सांगितले. हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पुरस्कार असून मी संघाचा  सेवक असल्याने हा पुरस्कार स्वीकारत आहे.