पराभवाची खंत बाळगू नका
नागपूर, दि. 04, नोव्हेंबर - कुठल्याही खेळात जय-पराजय होतच असतो. परंतु, पराभवामुळे खचून न जाता खेळाडूंनी नव्या जोमाने प्रयत्न करावेत असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपुरातील मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित 82 व्या राष्ट्रीय बॅडमिंटनअजिंक्यपद स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी गडकरी म्हणाले की, नागपुरात बॅडमिंटनसाठी आवश्यक त्या सर्व सोयी महानगरपालिकेच्या साहाय्याने उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, , हीच गौरवास्पद बाब आहे . देशभरातून नागपुरात आलेल्या बॅडमिंटनपटूचे नागपूरचा खासदार या नात्याने आपण स्वागत करतो. या स्पर्धेतील सामने शालेय व महाविदयालयीन विदयार्थी यांना पाहण्याची संधी मिळत असल्याने त्यांच्यातील क्रीडा नैपुण्याला निश्चितच प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
73 व्या आंतर राज्य आंतर विभागीय आजिंक्यपद स्वर्धेचे विजेतेपद पेट्रोलियम स्पोर्टस प्रमोशनल बोर्ड (पी.एस.पी.बी.)च्या संघाने पटकावले. यावेळी विजेत्या संघाला 3 लक्ष रूपयांचा धनादेश चषक, खेळाडूंना स्वतंत्र पदके गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या स्पर्धेचा उपविजेता ‘मध्यप्रदेश’चा संघ ठरला. त्यांना 2 लक्ष रुपयांचा धनादेश, चषक व पदके या स्वरूपाचे बक्षिस देण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून नागपूरचे माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू सी. डी. देवरस व महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष प्रदीप गंधे यांनी बॅडमिंटनच्या क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांचा सत्कार गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानचिन्ह व 1 लक्ष रुपयांचा धनादेश असे या पुरस्कारचे स्वरूप होते .
त्याचप्रमाणे गडकरी यांच्या हस्ते शटलच्या प्रतिकृतीची कळ दाबून 82 व्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. मानकापुर विभागीय क्रीडा संकुलात 2 ते 8 नोव्हेंबरपर्यंत होत असलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील सुमारे 500 खेडाळू सहभागी होणार असून यादरम्यान 450 पेक्षा जास्त सामने होतील. भारतातील बँडमिटनचे शीर्ष खेडाळू पी. व्ही. सिंधू , सायना नेहवाल, किदांबी श्रीकांत या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. 22 हजाराच्या वर शालेय व महाविद्यालयीन विदयार्थी या स्पर्धांना उपस्थित राहतील, अशी माहिती महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अरूण लाखानी यांनी आपल्या प्रास्ताविकातून यावेळी दिली. या कार्यक्रमास नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दिक्षित, स्थानिक लोकप्रतिनिधी, महाराष्ट्र बॅडमिंटन संघटना, भारतीय बॅडमिंटन महासंघ तसेच नागपूर जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.