Breaking News

मुंबई फिरायला आलेल्या अट्टल चोरट्यांकडून 9 सोनसाखळ्या जप्त

मुंबई, दि. 20, नोव्हेंबर - मुंबई फिरायला आलेल्या दोन अट्टल चोरट्यांकडून पोलिसांनी 9 सोनसाखळ्या जप्त केल्या आहेत. आकाश लाल आणि भीकू दोघे दिल्लीहून मुंबई फिरण्यासाठी आले होते. आकाश आणि भीकू मिरा रोडमध्ये राहणा-या आपल्या नातेवाईकांकडे आले होते. 


आकाश सिंग आणि विमल सिंग या दोघांच्या मदतीने भीकूने एक दुचाक ी विकत घेतली. आकाश आणि भीकूने दुचाकीवरून फिरून चार दिवसांत 9 सोनसाखळ्या चोरल्या होत्या. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आकाश सिंग आणि विमल आकाश लाल यांना अटक करण्यात आली असून भिकू हा आरोपी अद्यापही फरार आहे. या तिघांकडून पोलिसांनी 175 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे.