Breaking News

गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलिस निरीक्षकाने घेतली लाच

औरंगाबाद, दि. 14, ऑक्टोबर - गुन्हा दाखल न करण्यासाठी 35 हजारांची लाच घेणा-या बेगमपुरा ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसीम हाश्मी यांना लाचलुचपत विभागाने गुरुवारी रंगेहाथ अटक केली तर आज तहसील कार्यालयातही 400 रूपयांची लाच स्विकारणा-या कर्मचा-याला पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तक्रारदाराचा एका व्यक्तीसोबत जमीनविक्रीवरून वाद झाला. धनादेश न वटल्याने या व्यक्तीने हाश्मी यांच्याकडे तक्रार करूनही पोलिसांनी कारवाई केली नाही. या व्यक्तीने उच्च न्यायालयात याचिका दाखल असता न्यायालयाने दोन्ही गटांचे जबाब नोंदवण्याचे आदेश दिले. हाश्मी यांनी ज्याच्या विरोधात तक्रार होती त्याला ठाण्यात बोलावत गुन्हा दाखल करायचा नसेल तर 40 हजारांची मागणी केली. 35 हजारांत व्यवहार ठरला. संबंधिताने तक्रार दिल्यावर लाचलुचपतच्या उपअधीक्षक वर्षाराणी पाटील, शंकर जिरगे, यांच्या पथकाने ही कारवाई केली. हाश्मी यांच्या संपत्तीची मोजदाद करण्यात येणार असल्याचे समजले.