मध्यरात्री ते पहाटेपर्यंत लोकल सेवा सुरू ठेवाण्याची मागणी
मुंबई, दि. 16, सप्टेंबर - अनंत चतुर्दशीप्रमाणे दररोज मध्यरात्री ते पहाटेपर्यंत लोकल सेवा सुरु ठेवावी अशी मागणी मिरा भाईंदर मनपा सभागृह नेते रोहिदास पाटील यांनी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार गुप्ता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बोरिवली ते विरार परिसरात लोकवस्ती फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. हेच लोक आपल्या उदरनिर्वाहासाठी मुबईमध्ये दररोज ये-जा करत असतात. परंतु मध्यरात्री 12.00 वा ते 03.30 वा च्या दरम्यान लोकल ट्रेन सेवा बंद असते त्यामळे चाकरमान्यांची खूप मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते. त्याचबरोबर मध्यरात्रीच्या दरम्यान विरार, नालासोपारा, वसई, भाईंदरमधून मुंबईच्या दिशेने रुग्णाला रुग्णवाहिकेतून नेत असताना रात्री 09.00 वाजल्या नंतर अवजड वाहनांची वाहतूक सुरु झाल्यामुळे तसेच मेट्रो रेल्वेचे काम सुरु असल्याने रात्री सुद्धा महामार्गावर वाहतूक करता येत नाही. त्यामुळे अनेक रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अनेक गर्भवती महिलांची प्रसुती ही ट्रॅफिक जाम मुळे रुग्णवाहिकेत झाल्याची माहिती आहे. त्यासाठी अनंत चतुर्दशी व 31 डिसेंबर या दोन दिवसी मध्यरात्री 12.00 वा ते 03.30 वा च्या दरम्यान सुरु ठेवणार्या आठ फेर्या रेल्वे प्रशासनाने कायमस्वरूपी सुरु ठेवल्यास मध्यरात्रीच्या तीन तासाच्या अवधीमध्ये विरार-चर्चगेट व चर्चगेट-विरार अशा लोकल ट्रेन सुरु ठेवून प्रवाशांची सोय करावी, अशी मागणी मिरा भाईंदर मनपा सभागृह नेते रोहिदास पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे केल्याचे सांगण्यात येत आहे.