Breaking News

घरफोडी व वाहनचोरी करणा-या सहा आरोपींना अटक

पुणे, दि. 16, सप्टेंबर - चिचंवड पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये घऱफोडी व वाहनचोरी करणा-या सहा आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण  16 गुन्हे उघडकीस आणले असून 19 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गणेश दगडू शिंदे (वय 24 रा. मुळशी), दिलीप उर्फ अजय दुर्गेश शिकरे (वय 19 रा.  कामशेत), रोहिदास उर्फ काश्या संभाजी पवार (वय 24 शिवणे, मावळ) प्रमोद रामा क्षीरसागर (वय 36 रा. लोणावळा), नितीन हरी वेताळ (वय 18 रा. पर्वती  पायथा) आकाश विठ्ठल जगताप (वय 18 रा. निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत  गस्त घालत असताना विसर्जन घाटावर तीन संशयीत इसम दुचाकी वरुन फिरताना दिसले. यावेळी पोलिसांनी हटकले असता ते तिघेही पळून जाऊ लागले.  पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते काळेवाडीकडे जात असल्याचे सांगितले. मात्र तो रस्ता वाल्हेकरवाडीकडे जात  असल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता तपासात त्यांच्याकडून 19 तोळे सोने, एक मोटरसायकल, दोन  मोबाईल, चांदीचे दागिने, एक फियाट पुन्टो कार, रोख 57 हजार असा एकूण 16 लाख 43 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला. यातील गणेश शिंदे हा सराईत  गुन्हेगार असून तिघांकडून 10 गुन्हे उघडकीस आले आहेत.दुस-या कारवाईत गस्त घालत असताना आरोपी वेताळ व जगताप यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  यावेळी त्यांच्याकडून 10 ग्रॅम सोन्याची अंगठी, एक एलसीडी व लॅपटॉप, पाच मोटारसायकल, एक मोबाईल असा एकूण 2 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त  केला. तपासात त्यांच्याविरोधात तीन घरफोडीसह पाच गुन्हे असल्याचे उघड झाले.या दोन्ही कारवाईमध्ये वाकड, हिंजवडी, देहुरोड, भोसरी, तळेगाव,पौड, चिंचवड,  सांगवी, पिंपरी येथील एकूण 16 गुन्हा उघड झाले असून 19 लाख 1 हजार 500 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.ही करवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक  विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक गुन्हे विनायक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक एस.डिगे, अशोक आटोळे,  पोलीस नाईक स्वप्नील शेलार, पोलीस हवालदार विलास होनमाने, चंद्रकांत गडदे, ऋषीकेश पाटील, पोलीस शिपाई राहूल मिसाळ, सचिन वर्णेकर, अमोल माने,  गोविंद डोके, पंकज भदाने, महिला पोलीस कर्मचारी रुपाली पुरीगोसावी, महिला पोलीस नाईक कांचन घवले यांनी केली आहे.