उ.प्र.मधील बागपतमध्ये पूर येण्याची शक्यता,अतिदक्षतेचा इशारा
नवी दिल्ली, दि. 04, सप्टेंबर - मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेशातील बागपत येथे नदीच्या क्षेत्रांमध्ये पूर येण्याची शक्यता असल्याने नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. यमुना नदीमध्ये पाच लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे यमुना नदीच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे बागपत जिल्ह्यात पूर येण्याची शक्यता आहे.
अनेक दिवसापासून कोसळत असलेल्या पावसामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून हथिनी कुंड बैराज येथे शुक्रवारपासून पाण्याच्या विसर्ग करण्यात येत आहे. आतापर्यत पाच लाख 13 हजार 331 क्युसेक्स एवढे पाणी सोडण्यात आले आहे.