Breaking News

बुलडाणा अर्बनची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

बुलडाणा, दि. 16, सप्टेंबर - संस्थेच्या सर्वच सभासदांना केंद्रस्थानी ठेवून त्यांचे हित उद्दिष्ट आणि सर्वांगिण प्रगतीसाठी संस्था अखंडीतपणे कार्य करीत आहे आणि भविष्यातही हे कार्य आणखी जोमाने सुरु ठेवण्यासाठी संस्था कटिबद्ध राहील अशी ग्वाही देवून आर्थिक व सोशल बँकिंग क्षेमतेचा सहकार क्षेत्राला परिचय करुन देणारी बुलडाणा अर्बन केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देश विदेशातील पतसंस्थंसाठी एक दिपस्तंभ ठरली आहे, असे प्रतिपादन बुलडाणा अर्बनचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.सुकेश झंवर यांनी केले. 
बुलडाणा अर्बन संस्थेची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 10 सप्टेंबर रोजी सहकार विद्या मंदिर परिसरातील सहकार सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी संस्थेच्या सभासद, ग्राहकांना संबोधित करताना संस्थेचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.सुकेश झंवर बोलत होते. यावेळी बुलडाणा अर्बनच्या अध्यक्षा कोमलताई झंवर सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. सभेच्या व्यासपीठावर बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, उपाध्यक्ष राजेश देशलहरा, संस्थेचे संचालक सर्वश्री कांतीलाल छाजेड, रमेशचंद्र राठी, डॉ.किशोर केला, अजय सेंगर, अंबेश बियाणी, नंदकिशोर झंवर, नंदकिशोर बाहेती, किशोर महाजन, विनोद केडिया, डॉ.विनोद भंडारी, सुबोध काकाणी, दिनेश गांधी, गोपाल चिरानिया उपस्थित होते. प्रारंभी दिपप्रज्वलन झाल्यानंतर संस्थेच्या 31 व्या वार्षिक साधारण सभेच्या कामकाजाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी या आर्थिक वर्षात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किर्तीच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रातील महनिय व्यक्ती, शास्त्रज्ञ, सैन्य व पोलिस दलातील जवान त्याचप्रमाणे संस्थेचे सभासद त्यांचे कुटूंबिय व संस्थेचे दिवंगत कर्मचार्‍यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी बँकींग फ्रंटीर्सच्यावतीने बँकींग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल बेस्ट सीईओ पुरस्कार आणि औरंगाबादच्या सहकार परिषदेत को-कॉन 2017 पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर यांचा संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी इंदोर येथील रोहित सोमाणी यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या जीवनावर लिहिलेल्या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.
यावेळी बुलडाणा अर्बन संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत डॉ.सुकेश झंवर यांनी संस्थेच्या आजपर्यंतच्या यशस्वी घोडदौडीचा मागोवा घेतला. तर बुलडाणा अर्बन संस्थेत कर्तव्य बजावत असताना आपल्या निष्ठा व प्रामाणिकपणाचा प्रत्यय देणार्‍या श्रीमती वनिता इतवारे, संजय सोनुने, गणेश चौधरी, निलेश पठ्ठे, रामेश्‍वर नवल, पंढरीनाथ मिसाळ, बिपीन अग्रवाल, संजय सिरसाठ, दिपक थोरकर, सचिन बिसेन, संतोष तोंडारे, अजय सोनवळकर, सत्यनारायण शर्मा, विलास बरडे, प्रमोद गावंडे, पांडुरंग बगाडे आदी कर्मचार्‍यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन शिरिष देशपांडे व संजय कुलकणी यांनी केले. या सभेला संस्थेचे सहा हजारांवर सभासद उपस्थित होते.