उजनी धरणातून 70 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग
सोलापूर, दि. 16, सप्टेंबर - उजनी पाणलोट क्षेत्रात नीरा खोर्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने उजनी धरणातून 15 दरवाजातून 70 हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडण्यात आले आहे. तर नीरा नदी पात्रातून 40 हजार क्युसेक्स ने पाणी येत आहे. असे एकूण एक लाख 10 हजार क्युसेक्स विसर्ग संगम येथे मिसळत आहे. यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून उजनीच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्यामुळे गुरुवारी सायंकाळी दहा वाजता 15 दरवाजांमधून 40 हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात येत होते. त्यात शुक्रवारी सकाळी पुन्हा वाढ करून 70 हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. तर नीरा खोर्यातही दमदार पाऊस पडत असल्यामुळे नीरा नदी पात्रातून 40 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग संगम येथे भीमा नदीत मिसळत आहे. दोन्ही मिळून एक लाख 10 हजारांचा विसर्ग पंढरपूरकडे येत आहे. उजनी धरणातील विसर्ग नीरा नदीतील विसर्ग अशा दोन्ही विसर्गाचा संगम नीरा नरसिंहपूर येथे भीमा नदीत होत असल्याने संगमपासून पुढे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे भीमा नदीकाठच्या गावांसह माढा पंढरपूर तालुक्यातील नागरिकांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. शुक्रवारी सायंकाळी आठ वाजता बंडगार्डन येथून हजार 280 तर दौंड येथून एकूण 30 हजार 347 क्युसेक्स विसर्ग उजनीत मिसळत आहे. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने आणखी पाऊस झाल्यास उजनीतून पाणी सोडण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या उजनीत 108. 53 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.
पुणे,नीरा खोर्यातील धरणातून पाणी सोडले :पुणे जिल्ह्यातील भीमा खोर्यातील पाच धरणांतून केवळ हजार 903 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. तर नीरा खोर्यातील वीर धरणातून 14 हजार 411, भाटघर येथून हजार 667 गुंजवणे येथून 308 असा एकूण 16 हजार 86 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. मात्र उजनी पाणलोट क्षेत्रात नीरा नदी खोर्यातील पात्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असल्यामुळे नीरा भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.