अमेरिकेच्या पाकवरील टीकेनंतर चीन पाकच्या बचावासाठी पुढे
बीजिंग, दि. 23, ऑगस्ट - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला फटकारल्यानंतर चीन पाकिस्तानच्या बचावासाठी पुढे आला आहे. दहशतवादाच्या लढाईत पाकिस्तान कायम पुढे होता. दहशतवादविरोधी लढाईतसाठी पाकने मोठे त्याग केला आहे. या लढाईतील पाकचे योगदान उल्लेखनिय आहे, असे प्रतिपादन चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी केले आहे. आम्हाला आनंद आहे की पाक व अमेरिका आपापसातील सन्मान कायम राखत दहशतवाद विरोधातील लढ्यासाठी एकमेकांना सहकार्य करत आहे, असेही त्यांनी म्हटले.
आम्ही ज्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा प्रयत्न करत आहोत पाकिस्तान त्यांनाच आश्रय देत आहे. पाकिस्तानने आपली विघातक कृत्ये अशीच चालू ठेवली तर अमेरिका शांत बसणार नाही, अशा शब्दात ट्रम्प यांनी पाकवर टीका केली होती. आम्ही तुम्हाला अब्जावधी डॉलरची मदत करत आहोत, हे विसरू नका असा सूचक इशाराही यावेळी त्यांनी दिला. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांचे बचावाचे वक्तव्य प्रसिद्ध झाले.