गणेश प्रतिष्ठापनेसाठी दुपारी दीडपर्यंत शुभमुहूर्त; पंचांगकर्ते ओेंकार दाते यांची माहिती
सोलापूर, दि. 24, ऑगस्ट - गणेशाची प्रतिष्ठापना शुक्रवारी पहाटे साडेचार वाजल्यापासून दुपारी दीड वाजेपर्यंत करण्यासाठी अत्यंत शुभमुहूर्त आहे. मंगलमूर्ती माती किंवा शाडूची असावी, असा शास्त्रामध्ये उल्लेख आहे, असे पंचांगकर्ते ओंकार दाते यांनी सांगितले. गुरुवारी हरतालिका पूजन होणार आहे. यंदा दशमीची वृद्धी झाल्याने गणेशोत्सव 12 दिवसांचा असून, सप्टेंबरला विसर्जन आहे. त्यादिवशी मंगळवार असला तरीही नेहमीप्रमाणे गणेश विसर्जन करता येते. यापूर्वी सन 2008, 2009 2010 रोजी गणेशोत्सव 12 दिवसांचा होता. प्रतिष्ठापनेसाठीची मूर्ती सुमारे 7/8 इंच उंचीची असावी, ही मूर्ती आसनस्थ आणि सुबक असावी. तसेच मातीची अथवा शाडूची असावी, असे त्यांनी सांगितले.