शेतकरी कर्जमाफीसाठी राष्ट्रवादीचं भजन आंदोलन
सांगली, दि. 20 - सांगलीत शेतकरी कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनं भजन आंदोलन करण्यात आलं. भजनाव्दारे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देवाला साकडं घातलं. सरकारला कर्जमाफी करण्याची सुबुद्धी येवो आणि शेतकरी आत्महत्या थांबाव्यात, यासाठी हे आंदोलन करण्यात आलं.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. राज्यात कर्जबाजारीपणामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. अशा परिस्थितीतही कर्जमाफी करण्याची सुबुद्धी सरकारला येत नाही. त्यामुळं लवकरात लवकर सरकारला शेतकरी कर्जमाफी करण्याची सुबुद्धी येवो असं साकडं यावेळी आंदोलकांनी देवाला घातलं. या आंदोलनानंतर जिल्हाधिकार्यांना निवेदन देत शेतकरी कर्जमाफीची मागणी करण्यात आली.