झाकीर नाईकविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी
मुंबई, दि. 14 - वादग्रस्त मुस्लीम धर्मप्रचारक झाकीर नाईकविरोधात पीएमएलए कोर्टानं अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. आयसीसीस या दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत करणे, धार्मिक भावना भडकावणे आणि मुलांचे ब्रेनवॉश करणे हे आरोप इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा सर्वेसर्वा जाकीर नाईकवर ठेवण्यात आले आहेत. ज्यामुळे आता झाकीर नाईकच्या अडचणीत वाढ झाली आहे.
झाकीर नाईक याला इडीने चार वेळा चौकशीसाठी हजर राहण्याकरता समन्स बजावलं होते. पण झाकीर नाईक हजर न राहिल्याने शेवटी पीएमएलए न्यायालयानं आता झाकीर नाईक विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं. त्यातच झाकीर नाइक हा युएइमध्ये असल्याने आणि युएइ देशाशी भारताचे कायदेशीर पर्त्यार्पणाचे संबंध असल्याने हे वॉरंट परदेश मंत्रालयाच्यामार्फत युएइ सरकार आणि त्यानंतर जाकीर नाईक याला पाठवलं जाईल. इडीने याआधी झाकीर नाईकच्या आयआरएफ या संघटनेचा अकाऊंटंट आमिर गजदर याला अटक केली आहे. तसंच आमिर गजदर आणि जाकीर नाईकची बहिण यांनी इडीला दिलेल्या जबाबानुसार झाकीर नाईक यांच्या संस्थेला येत असलेल्या देणगीचा गैरवापर केला जायचा असा जबाब दिला होता.