Breaking News

रोहित शर्माला सामनाधिकार्‍याने दंड ठोठावला!

मुंबई, दि. 26 - मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला पंचांच्या निर्णयावर उघड नाराजी व्यक्त केल्याचा फटका बसला आहे. या प्रकरणी रोहितला एका सामन्याच्या मानधनाच्या 50 टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे.
पुण्याविरुद्धच्या सामन्यात मुंबईला अखेरच्या चार चेंडूंत 11 धावांची आवश्यकता होती. त्या वेळी जयदेव उनाडकटनं उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू पंच एस. रवी यांनी वाईड ठरवला नाही. पंचांच्या त्या निर्णयानं नाराज झालेल्या रोहित शर्मानं त्यांच्या दिशेनं चालत जाऊन आपला निषेध व्यक्त केला. लेग अंपायर नंदकिशोर यांनीही त्या वेळी तिथं जाऊन मध्यस्थी केली. मग पुढच्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित बाद झाला आणि त्याच्या मुंबई इंडियन्सला पुण्याकडून तीन धावांनी हार स्वीकारावी लागली. दरम्यान, रोहित शर्मानं पंचांच्या निर्णयाविरोधात व्यक्त केलेल्या उघड नाराजीप्रकरणी सामनाधिकार्‍यांनी त्याला मानधनाच्या 50 टक्के रकमेचा दंड ठोठावला आहे.