अभिनेता ऋषी कपूर यांना मुंबई महापालिकेची नोटीस
मुंबई, दि. 20 - मुंबई महापालिकेने अभिनेता ऋषी कपूर यांना नोटीस पाठवली आहे. वांद्र्यातील पाली हिल्समध्ये असलेल्या कृष्णा राज बंगल्यातील वडाच्या झाडाच्या फांद्या परवानगीपेक्षा जास्त कापल्याने ही नोटीस पाठवली आहे. महापालिकेच्या एका अधिकर्याने सांगितलं की, मागील आठवड्यात ऋषी कपूर यांना झाडाच्या सहा फांद्या छाटण्याची परवानगी दिली होती. इमारच्या बांधकामात अडचणी येत असल्याने त्यांना परवानगी दिली होती. परंतु निरीक्षण केलं असता असं दिसलं की, झाडाच्या जास्त फांद्या कापल्या आहेत.
झाडाच्या फांद्या छाटायला परवानगी दिली होती. पंरतु परवानगीचा चुकीच्या पद्धतीने वापर करुन झाडाच्या बळकट फांद्या कापल्या. त्यामुळे ऋषी कपूर आणि कंत्राटदारांना नोटीस पाठवून उत्तर मागितलं आहे, असं महापालिकेच्या अधिकार्यांनी सांगितलं. तुमच्यावर कारवाई का करु नये, अशी विचारणा करत ऋषी कपूर यांना उत्तर देण्यासाठी 24 तासांची मुदत देण्यात आली आहे. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण तसंच जतन (सुधारणा) अधिनियम 155 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी बीएमसीला पोलिसांत तक्रार दाखल करावी लागेल.