तूर खरेदीला आणि पैसे मिळायला दोन महिने उलटणार?
मुंबई, दि. 26 - फक्त 22 एप्रिलपर्यंतच नोंदणी झालेल्या तूर खरेदीची सरकारने घोषणा केली खरी, पण 22 एप्रिलपर्यंतची तूर खरेदी करायचं ठरलं तरी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. कारण नाफेडने संपूर्ण यंत्रणा कामाला लागली तरी, नोंदणी झालेली तूर खरेदी करण्यासाठी महिना उलटण्याची शक्यता आहे. तूर खरेदीनंतर शेतकर्यांच्या हातात पैसे पडायला किमान दोन महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतरही तूर खोळंबा कायम राहण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत जेवढ्या शेतकर्यांनी तूर खरेदी केंद्रावर नोंदणी केली आहे, त्यांची तूर 5 हजार 50 रुपये हमीभावाने खरेदी केली जाईल, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. व्यापार्यांकडे तुरीला साडे तीन ते चार हजार रुपये भाव आहे. मात्र सरकार नाफेडच्या तूर खरेदी केंद्रांवर 5 हजार 50 रुपये हमीभावाने तूर खरेदी करणार आहे. यासाठी सरकार एक हजार कोटी रुपये अधिकचे उपलब्ध करून देईल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.