Breaking News

अनाथ सागरने जुळविल्या 28 अनाथ मुलींच्या लग्नगाठी

नाशिक, दि. 14 - एक वर्षाचा असतानाच त्याच्या आई-वडिलांची हत्या झाली... एका संस्थेत तो वाढला. पण वयाच्या अठराव्या वर्षी सरकारी नियमाप्रमाणे त्याला संस्थेच्या बाहेर काढण्यात आले. त्यानंतर रस्त्यावर राहून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेला सागर रेड्डी आज तरुणांचा ‘आयकॉन’ बनला आहे. अर्थात त्यामुळे त्याच्या डोक्यात अजिबातच हवा गेली नाही. परिस्थितीची जाण ठेवत तो आता मोठ्या झालेल्या अनाथ मुलांच्या हक्कासाठी झगडतोय. इतकेच नाही तर त्यांनी हैदराबाद येथे नुकताच 28 अनाथ मुलींचा सामुदायिक विवाह देखील लावून दिला.
आंतरधर्मीय विवाह केला म्हणून सागरच्या नातेवाइकांनीच त्याच्या आई-वडिलांचा मुंबईत निर्घृण खून केला. त्यावेळी सागर अल्पवयीन होता. सैराट चित्रपटाच्या कथानकासारखीच ही कहाणी. अनाथ झालेल्या सागरला त्याच्या आजी-आजोबांनीही सांभाळायला नकार दिला. कमालीचा हुशार असलेल्या सागरला अखेर अनाथ मुलांचे संगोपन करणार्‍या एका संस्थेत त्याला दाखल करण्यात आले.