आरोपी मनीष भंगाळेच्या जामीन अर्जावर 25 एप्रिल रोजी निकाल
जळगाव, दि. 21 - मनिष भंगाळे विरूध्द सायबर विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर आरोपी मनिषने मुख्य महानगर दंडाधिकारी देशपांडे यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर जामिनासाठी ड. ए.के.सिंग यांच्यामार्फत अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये आज युक्तिवादाचे कामकाज झाले. त्यात फिर्यादी रवींद्र ब-हाटे यांच्यातर्फे ड. हरूल देवरे यांनी वकीलपत्र दाखल केले. यावर आरोपी व सरकार दोन्ही पक्षांनी वकीलपत्र दाखल करण्यास हरकत नसल्याचे सांगितले. तपास अधिकारी सरदेसाई यांनी पुन्हा 2 दिवस पोलीस कोठडीची मागणी केली होती. परंतु ती नामंजूर करण्यात आली. जामीन अर्जावर आरोपीतर्फे ड. ए.के. सिंग, सरकारतर्फे विशेष सरकारी वकील फोन्डा तर फिर्यादीतर्फे ड. हरूल देवरे यांनी युक्तिवाद केला. या अर्जावर आता 25 एप्रिल रोजी निकाल होणार आहे.