चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 मुदत संपली, अजूनही भारतीय संघाची घोषणा नाही
मुंबई, दि. 26 - इंग्लंडमधल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघनिवड जाहीर करण्याची आयसीसीनं दिलेली अंतिम मुदत मंगळवारी उलटून गेली, तरीही बीसीसीआयनं टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. इंग्लंडमध्ये एक ते 18 जून या कालावधीत आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आठ संघांचा समावेश असून, भारताचा अपवाद वगळता अन्य देशांनी आपापली संघनिवड जाहीर केली आहे.
बीसीसीआय आणि आयसीसी यांच्यामध्ये महसुलच्या वाटणीवरून सुरू असलेल्या वादामुळं टीम इंडियाची घोषणा लांबवण्यात आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीची संघघोषणा ही एक निव्वळ औपचारिकता आहे आणि आम्ही पाच मे रोजी संघ घोषित केला म्हणून आयसीसी भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यास मनाई करणार आहे का? अशी उपाहासात्मक प्रतिक्रिया बीसीसीआयच्या एका ज्येष्ठ पदाधिकार्यानं व्यक्त केली आहे.