पिंपरीत राष्ट्रवादीला धक्का, पवारांचे निकटवर्तीय आझम पानसरे भाजपात
पिंपरी-चिंचवड, दि. 09 - पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राष्ट्रवादीचे नेते आझम पानसरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
मुंबईमध्ये रविवारी रात्री 11.30 वाजता पानसरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. पानसरे पिंपरी चिंचवडचे माजी शहराध्यक्ष होते. विधानपरिषदेची उमेदवारी न दिल्याने ते काहीसे नाराज होते. अजित पवारांपेक्षाही आझम पानसरे शरद पवार यांच्या जवळचे होते, असं म्हटलं जायचं. आगामी महापालिकेसाठी पानसरे हे राष्ट्रवादीचा चेहरा होते. त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे.