9 जूनला गुलबर्ग हत्याकांडातील दोषींचा फैसला शिक्षेचा निर्णय
अहमदाबाद, दि. 06 - 2002 साली गुजरातमध्ये झालेल्या दंगलीतील गुलबर्ग सोसायटी हत्याकांड प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या 27 आरोपींच्या शिक्षेवरील सुनावणी 9 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली असून सर्व दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आज झालेल्या सुनावणीत सरकारी वकीलांकडून करण्यात आली.
2 जून रोजी एकूण 24 आरोपींना या प्रकरणी विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) विशेष न्यायालयाने दोषी ठरविले होती. सरकारी पक्षातर्फे दोषींपैकी खून केल्याचा आरोप असलेल्या 11 जणांना फाशीची शिक्षा ठोठाविण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली. तर या 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात केली. एकूण 66 पैकी 24 जणांना विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. बी. देसाई यांनी दोषी ठरविले आहे. दोषी ठरविण्यात आलेल्या आरोपींमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यासह भारतीय जनता पक्षाचा विद्यमान नगरसेवक बिपीन पटेल, काँग्रेसचा माजी नगरसेवक मेघश्याम चौधरी आणि तत्कालीन पोलिस निरीक्षकाचाही समावेश आहे. तसेच, या प्रकरणातील एकूण 66 आरोपींपैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. गुलबर्ग सोसायटीत काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्यासह 69 जणांची जाळून हत्या करण्यात आली होती.