महाप्रसादातून 90 भाविकांना विषबाधा
जालना - कीर्तनाच्या प्रसादातून 90 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातील सेवगावमध्ये महाप्रसादाच्यावेळी हा प्रकार घडला.
तुकाराम बीज कार्यक्रमानिमित्त सेवगावमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसाद खाल्ल्यानंतर भाविकांना त्रास व्हायला सुरुवात झाली. त्यावेळी तात्काळ सर्व भाविकांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर काही जणांवर अद्यापही उपचार सुरु आहेत.