Breaking News

राज्यव्यापी बालकुमार युवा साहित्य संमेलनाचे आयोजन

 बुलडाणा (प्रतिनिधी) । 23 - महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सहकार्याने, प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या पुढाकाराने बुलडाणा नगरीत 12 आणि 13 मार्च रोजी राज्यस्तरीय बालकुमार युवा साहित्य संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले असून या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी, चित्रपट गीतकार दासू वैद्य यांची निवड करण्यात आली आहे. 
बुलडाणा शहरातील निवडक साहित्यरसिकांच्या उपस्थितीत डॉ. गणेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या एका बैठकीमध्ये साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षा श्रीमती अरूणा कु‘ी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दोन दिवसीय बालकुमार युवा साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील दिडशेपेक्षा जास्त लेखक, साहित्यिक विविध कार्यक‘मात सहभागी होणार असून कार्यक‘माच्या संयोजन पदी नरेंद्र लांजेवार यांची निवड करण्यात आली आहे.
 बुलडाणा शहरातील निवडक व्यक्तींची लवकरच एक स्वागत समिती गठीत करण्यात येणार आहे. या दोन दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनात बालकुमार आणि युवकांसाठी कवी संमेलन, मुलाखती, परिसंवाद, अभिरूप न्यायालय, रिंगण नाट्य, प्रगट मुलाखत, मराठी-हिंदी-उर्दु गजल मुशायरा, युवाकट्टा, युवाज‘ोष असे विविध कार्यक‘मांचे आयोजन करण्याचा मानस आहे. या साहित्य संमेलनाच्या स्वागत समितीत सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी लवकरात लवकर 25 मार्चपर्यंत श्रीमती अरूणाताई कु‘ी (9422800313), पंजाबराव गायकवाड (8087339015), कि.वा.वाघ(8308322906), प्रा.सुनील देशमुख  (9822834664) यांच्याकडे नाव नोंदणी करावी असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने शाहिणा पठाण यांनी केले आहे.