अभिनेता संजय दत्तची अखेर सुटका; पुण्याहून मुंबईकडे रवाना
पुणे : अभिनेता संजय दत्तची अखेर सुटका झाली आहे. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगल्यानंतर संजय दत्त पुण्याच्या येरवडा तुरुंगातून मुंबईकडे रवाना झाला आहे. बाहेर आल्यानंतर संजयने पहिल्यांदा येरवडा तुरुंगाला सलाम ठोकला आणि त्यानंतर बॅग उचलून निघाला. संजयला घेण्यासाठी यावेळी दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि त्यांच्या टीममधील काही जण उपस्थित होते.
‘आजादी इतनी आसान नहीं है,’ अशी प्रतिक्रिया संजय दत्तने जेलमधून सुटल्यानंतर दिली. संजय दत्तला पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. शिवाय माध्यमांचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामुळे कडेकोट बंदोबस्तात एका कारमधून त्याला विमानतळाच्या दिशेन रवाना करण्यात आलं. पुणे विमानतळावर त्याची पत्नी मान्यता उपस्थित होती. संजय दत्तचं चार्टर्ड प्लेन 10.30 वाजता पुण्याहून मुंबईच्या दिशने निघणार आहे.