Breaking News

उपायुक्त युवराज भदाणे यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न!

उल्हासनगर, 20 - उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त आणि जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांना पालिकेच्या आवारातच जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  
दुपारी 1 वाजताच्या सुमारास भदाणे हे कारमध्ये बसले असताना दोन अज्ञात व्यक्ती मोटारसायकलने कार पार्किंगच्या आवारात आले आणि पेट्रोलने भरलेली बाटली कारवर टाकून आग लावली. भदाणे यांनी तात्काळ कारमधून पळ काढल्याने त्यांचा जीव वाचला. भदाणे यांची वॅगनर गाडी जळून खाक झाली आहे. महापालिकेच्या आवारातच अशी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. अज्ञात व्यक्ती हेल्मेट घालून आल्याने त्यांना शोधण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर आहे.