Breaking News

जिल्ह्यातील 158 ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर

जळगाव, दि. 03, फेब्रुवारी - जळगाव जिल्ह्यातील 58 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक व 105 ग्रामपंचायतींमधील रिक्त असलेल्या सदस्य पदांसाठी पोट निवडणुकीचा क ार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला आहे. या एकूण 158 ग्रामपंचायतींसाठी 25 फेब्रुवारी रोजी मतदान व 26 फेब्रुवारी रोजी मतमोजणी घेण्यात येणार आहे. तर 25 जानेवारी रोजी तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध केली आहे.

तालुकानिहाय ग्रामपंचायती : - जळगाव : नंदगाव, बेळी, करंज,आमोदे बुद्रुक, धरणगाव : चांदसर बुद्रुक, पाळधी बुद्रुक, भोद खुर्द., एरंडोल : भालगाव बुद्रुक, खडके बुद्रुक, वरखेडी, वनकोठे, खेडगाव., जामनेर : गोंदखेळ, खडकी, तोरनाळे, सामरोद, पहूर पेठ, एकुलती बुद्रुक, नायदाभाडी, शेंदुर्णी, कापूसवाडी, शहापूर, गोरनाळे-तोरनाळे, दों दवाडे, पठाडवाडा, गारखेडा खुर्द, शिंगाइत, भुसावळ : चोरवड, गोजोरे, सुनसगाव, वराडसिम, बोदवड : गाळेगाव, येवती, यावल : थोरगव्हाण, रावेर : विटवे., चाळीसगाव : रामनगर, खेडगाव, न्हावे, खेरडे, सेवानगर. भडगाव : कनाशी, गोंडगाव, शिंदी. अमळनेर : गोवर्धन, दोधवद, अमळगाव, ढेकुसीम, मंगरूळ, भरवस, लोंढवे, चोपडा : अंबाडे, तावसे खुर्द, नरवाडे, वाळकी, विचखेडे, घुमावल बुद्रुक, कोळंबे, कठोरे.
तालुकानिहाय पोटनिवडणूक होणार्‍या ग्रामपंचायतींची संख्या : अमळनेर 10, भडगाव 8, रावेर 20, यावल 18, पारोळा 16, पाचोरा 8, मुक्ताईनगर 17, जामनेर 4, जळगाव 7, एरंडोल 4, धरणगाव 7, चोपडा 6, चाळीसगाव 4, बोदवड 2, भुसावळ 1. आदी ग्रामपंचायतींची संख्या आहे.