Breaking News

नैसर्गिक कृत्यासाठी खून करणा-या व्यक्तीस अटक

नागपूर, दि. 20, नोव्हेंबर - अनैसर्गिक कृत्य करण्याच्या उद्देशाने खून करणार्‍या एका सिरीयल किलरला लकडगंज पोलिसांनी अटक केली आहे. तसेच आरोपीला अटक के ल्यानंतर त्याने केलेले अन्य गुन्हेही समोर आले आहेत. आरोपीने आतापर्यंत चार खून केले असून एका खुनातून त्याची निर्दोष सुटका झाली आहे.

दुर्गेश ऊर्फ छल्ला चौधरी (वय 28) असे आरोपीचे नाव आहे. गेल्या 26 ऑक्टोबरला दुपारी दीड वाजता लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इतवारी रेल्वेस्थानक मालधक्का प रिसरातील झुडुपात एका तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. यावेळी पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी तेथे आढळलेल्या काही वस्तू जपून ठेवल्या होत्या. 

वस्तूंच्या आधारे हा मृतदेह नंदनवन परिसरातील राहणारा मोहम्मद अरमान मोहम्मद मालेसरवर या मुलाचा असल्याचे समजले. मोहम्मद 23 ऑक्टोबरपासून बेपत्ता झाला होता. पोलिसांनी त्याच्या आईवडिलांना मृतदेहाजवळ सापडलेले कपडे व इतर वस्तू दाखवल्यानंतर त्या वस्तूंच्या आधारे हा मृतदेह अरमानचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासले असता अरमान हा एका तरुणासोबत मालधक्क्याकडे जाताना दिसला. 

हा व्यक्ती दुर्गेश चौधरी असल्याचे फुटेजवरुन समजले. त्यानंतर पोलिसांनी दुर्गेश चौधरी याला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने अरमानच्या खुनाची कबुली दिली. त्याशिवाय त्यापूर्वी एप्रिल 2017 मध्ये कैलाश पुनाराम नागपुरे याच देखील याच पद्धतीने खून केला. काही दिवसांनी पुन्हा आरिफ मुन्नो अंसारी याचाही दगडाने ठेचून खून केला. त्याची ओळख अद्याप पटायची आहे. त्याने अनेक ठिकाणी चोरी व घरफोडया केल्या या सा-याची कबूली दिली.