Breaking News

मोटारवाहन निरीक्षकपदी निखिल रायकर


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नुकत्याच घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत येथील निखिल चंद्रकांत रायकर यांची मोटारवाहन निरीक्षक या पदावर निवड झाली आहे. निखिल रायकर यांचे शिक्षण प्रवरानगर येथील प्रवरा सैनिक स्कूल येथे 12 वीपर्यंत तर ट्रिनिटी कॉलेज, पुणे येथे इंजिनियरिंगमध्ये यांत्रिकीचे पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण झालेले आहे. त्यांचे वडील चंद्रकांत रायकर हे नुकतेच राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. निखिल रायकर यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.