Breaking News

भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानांची निर्मिती करण्यावर भर - सुरेश प्रभू


भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानांची निर्मिती करण्यावर आम्ही भर देणार आहोत, असे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी स्पष्ट केले आहे. 'मेक इन इंडिया' अंतर्गत हवाई उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे. त्यामाध्यातून पर्यटन क्षेत्रातील सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. प्रभू म्हणाले, विमान प्रवाशांना हवाई सफरीचा सुखद अनुभव यावा असा सरकारचा उद्देश आहे. त्यासाठी ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. विविध एअरलाईनचे प्रमुख, विमानतळ संचालक, सार्वजनिक-खासगी भागीदारी, पायाभूत सुविधा, हवाई संपर्कासारख्या व्यापक मुद्द्यांवर यासंबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रभूंनी गुरूवारी मार्गदर्शन केले.