Breaking News

आत्मा मालिकमध्ये शिक्षक अभिनय कार्यशाळा उत्साहात


कोपरगाव / ता. प्रतिनिधी । आत्मा मालिक ललित कला अकादमी कोकमठाण आयोजित शिक्षक अभिनय तीन दिवसीय कार्यशाळा 2018 नुकतीच आत्मा मालिक शैक्षणिक व क्रिडा संकुलात मोठया उत्साहात संपन्न झाली. यामध्ये प्रशिक्षक म्हणून नाटयशाला मुंबईच्या संचालिका, जेष्ठ रंगकर्मी, नाटककार, साहित्यिक अभिनेत्री कांचन कमलाकर-सोनटक्के व ज्येष्ठ रंगकर्मी मार्गदर्शक नाटककार साहित्यीक लेखक पाडुरंग घांग्रेकर यांनी शिक्षकांना अभिनयाचे प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेप्रसंगी कांचन सोनटक्के यांनी सांगितले की, शिक्षकांच्या सर्वांगीण विकासावर भर घालणारी ही पहिलीच संस्था आहे. शिक्षकांसाठी अभिनय कार्यशाळा घेवून शिक्षकांच्या सुप्त गुणांमध्ये भर टाकणारी ही संस्था आहे. तीन दिवसीय कार्यशाळेत अभिनय व त्यांचे प्रकार नाटयखेळ, मुकअभिनय, उत्स्फुर्त नाटय, शालेयनाटय, नाटयसंगीताची निवड रंगमंच, भाव, रस, भाषा, प्रभुत्व, धीटपणा, वाचन, नाटयवाचन, नाटय, व्यक्तीमत्व विकास, तोंड ओळखसह प्रात्यक्षिके सादर केली. जवळजवळ 40 शिक्षक या कार्यशाळेसाठी आत्मा मालिक विविध शाखांमधून उपस्थित होते. आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी म्हटले की, शिक्षक हा एक अभिनेताच असतो. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर शिक्षक हा सर्वगुण संपन्न असावा म्हणून हा सारा प्रयत्न आणि अशा प्रकारच्या वेगवेगळया कार्यशाळा व शिबिरे वर्षभर शिक्षकांसाठी आम्ही राबवत असतो. जेणेकरून शिक्षकांच्या ज्ञानात जास्तीत जास्त भर पडावी. या कार्यक्रमप्रसंगी आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, प्राचार्य माणिक जाधव, संदिप गायवाड, उपप्राचार्य रमेश कालेकर, जेष्ठ रंगकर्मी, पाडूरंग घांग्रेकर आदी उपस्थित होते. या कायर्र्क्रमाचे प्रास्ताविक रमेश कालेकर यांनी केले. सुत्रसंचालन अजय देसाई यांनी केले.