Breaking News

कान्हेगावला कान्हेश्‍वर मंदिराचे भूमीपूजन


कोपरगाव / ता.प्रतिनिधी ।  तालुक्यातील कान्हेगाव येथे महादेव मंदिराचे भूमीपूजन रमेश गिरी महाराजांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. कान्हेगाव येथील कान्हेश्‍वर मंदीर सुमारे पाचशे वर्षापूर्वीचे होते. हेमाडपंथी असलेले हे मंदिर गेल्या काही वर्षांपासून जीर्ण अवस्थेत होते. मंदीर पूर्णतः पडल्याने तरुणांनी एकत्र येऊन मंदिर बांधन्याचे ठरविले. या मंदिरासाठी एकूण खर्च अंदाजे वीस लाख रुपये आहे. मंदिरासाठी वर्गणी गोळा करण्याचे चालु आहे. दरम्यान महंत रमेश गिरी महाराजांच्या हस्ते भूमी पूजन करून कामास सुरुवात करण्यात आली. गावाचे ग्रामदैवत असलेल्या भगवान नृसिंह जयंतीचा कार्यक्रम उद्या सायंकाळी 6 वाजता होणार आहे. त्यानिमित्ताने हभप शिवाजी महाराज भालूरकर यांचे कीर्तन होणार असून रविवारी सकाळी 10 वाजता हभप हरीशरणगिरी महाराज बाजाठाणकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. तरी भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. यावेळी शिवाजी ठाकरे, सुरेश गिरे, अशोक काजळे, रंगनाथ काजळे, रावसाहेब भाकरे, जनार्दन जगताप, शांताराम सिनगर, लक्ष्मण चौधरी, अरुण काजळे, मच्छिंद्र जगताप, बाळासाहेब काजळे, किसन काजळे, जालिंदर शिरसाट, संदीप वाळुंज, किशोर तायडे, दीपक चौधरी, अशोक काजळे, विठ्ठल वाळुंज, वाल्मिक वाळुंज, सुनिल काजळे, सिध्दांत गोसावी, रामदास काळे, नारायण सुरभैया, शुभम चौधरी, सागर शिंदे यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.