Breaking News

भुसावळ एमआयडीसीत आग; लाखोंचे नुकसान


जळगांव, दि. 29, एप्रिल - जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील खडका किन्ही नवीन औद्योगिक वसाहतीमधील रिलायबल ब्रिकेट कारखान्यास अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही. परंतू आगीत सुमारे 70 ते 80 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमनच्या बंबानी सहा ते सात तास अथक प्रयत्नानतंर आगीवर नियंणा मिळविण्यात यश आले. शॉकसर्किटमुळे कपॅसिटर फुटून आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.