Breaking News

मोबाईल चोरी करणारी टोळी नाशिक पोलिसांच्या ताब्यात

नाशिक, दि. 29, एप्रिल - एकांतात नागरिकांना धाक दाखवून मोबाईल चोरी करणार्‍या टोळीला पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे 5 लाख 46 हजार रूपये किंमतीचे विविध कंपन्यांचे 109 मोबाईल सेट ताब्यात घेतले आहेत.


नाशिक शहरातील निर्जन परिसर तसेच जिल्ह्यातील सायखेडा, वणी, आडगाव, निफाड, पिंपळगाव आदी परिसरात मोटरसायकलवर फिरून निर्जनस्थळी लोकांना शस्त्रांचा धाक दाखवून ही टोळी मोबाईल चोरत असत. याशिवाय आठवडे बाजारातही खरेदीला येणार्‍या लोकांच्या खिशातील मोबाईलची चोरी ते करत. या प्रकरणी तक्रारीही आल्या होत्या.
पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पंचवटी पोलिसांना गटर्‍या नागू गायकवाड, संपत वाघ व त्याचा एक साथीदार, विकी ऊर्फ गट्ट्या जाधव व त्याचे दोन साथीदार यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून जबरी चोरीचे 3, तर मोबाईल चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आले असून ग्रामीण भागातील आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.