Breaking News

आरक्षणासंदर्भात पारनेर तालुका सकल मराठा समाजाची आज बैठक

मराठा आरक्षण जनसुनावणी पूर्वतयारीसाठी पारनेर तालुका सकल मराठा समाज-मराठा क्रांती मोर्चाची महत्वपूर्ण बैठक पारनेर येथे आज दुपारी 4 वा. आयोजीत करण्यात आली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष, न्यायमूर्ती एम.जी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षणासाठी संशोधन संस्थांच्या नेमणुका करण्याचे काम सुरू आहे. मराठवाडा विभागाचे बहुतांश सर्वेक्षण झाले आहे. या कार्यक्रमांतर्गत 2 मे 2018 रोजी मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. सर्जेराव निमसे व बालसराफ जनसुनावणीसाठी अहमदनगर येथे मुख्य शासकीय विश्रामगृह येथे उपस्थित राहणार आहेत. या सुनावणीदरम्यान मराठा समाजातील व्यक्ती, संस्था, संघटना, अभ्यासक, विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या समाजबांधवांकडून मराठा समाज आरक्षणास कसा पात्र आहे, याबाबत अभ्यासपूर्ण निवेदने मोठ्या प्रमाणात सादर होणे अत्यंत आवश्यक आहे. आयोगाचा अहवाल सकारात्मक असने हा आरक्षण मिळविण्यासाठी अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे.अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून संदर्भ व पुराव्यांसह सविस्तर अभ्यासात्मक निवेदने आयोगाला दिली जावीत, यासाठी तालुक्यात योग्यप्रकारे जागृती व तयारी करणे आवश्यक आहे. 2 मे रोजी होणार्‍या जनसुनावणीच्या पूर्वतयारीसाठी या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीस मराठा बांधवांनी मोठ्या संखेने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.