Breaking News

वाटर कप स्पर्धा डिकसळ, राक्षसवाडी येथे कामासाठी पोकलेन मशीन

भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मूथ्था यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्र महत्वकांक्षी उपक्रम हाती घेतला असून, पानी फाउंडेशन आयोजीत सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 मधील सहभागी गावांना भारतीय जैन संघटनातर्फे दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी मशीन दिले जात आहेत. कर्जत तालुक्यात डिकसळ, राक्षसवाडी बु. येथे पोकलेन मशीन ने काम सुरू करण्यात आले.


कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे यांचे हस्ते नारळ वाढवुन शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार किरण सावंत पाटील हे होते. यावेळी सरपंच अ‍ॅड. महेंद्र शिंदे यांनी प्रास्ताविक करताना गाव श्रमदान करत चांगली मेहनत घेत असून महाराष्ट्राच्या स्पर्धेत आम्ही बाजी मारणार असल्याचे म्हटले. यावेळी मा. सरपंच तात्यासाहेब वडवकर, मारुती थेटे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी मार्गदर्शन केले. तर भारतीय जैन संघटनेचे प्रकल्प संचालक आशिष बोरा यांनी संघटनेच्या कार्याचा परिचय देताना भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मूथ्था यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्र हा महत्वकांक्षी उपक्रम हाती घेतला असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगताना, जी गावे अद्यापी या स्पर्धेत सक्रिय नाहीत त्यांना महत्व पटवुन देणार असल्याचे सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे यांनी पाण्याचे महत्व सांगताना आपण मातीत गाळलेला घाम पुन्हा पाणी रूपाने आपल्यालाच मिळणार असल्याचे सांगितले. त्यामुळे डिकसळ गावाने या संधीचे सोने करावे असे आवाहन करताना भारतीय जैन संघटनेच्या कार्याचा गौरव केला. यावेळी गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडेंसह भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष अभय बोरा, संघटनेचे मार्गदर्शक प्रसाद शहा, उपसरपंच अरुणा थेटे, धन्यकुमार खाटेर, प्रीतेश कटारिया, कुमार नहार, नीरज कोठारी, प्रतीक कोठारी, सुयोग कटारिया, आदेश बोरा, पुनीत बोरा, बीजेएसचे प्रकल्प समन्वयक शरद थोरात, पाणी फाउंडेशनचे अमोल लांडगे, बाळासाहेब बगाटे, ग्रामस्थ डॉ. मनोहर लाढाने, मारुती पवार आदी उपस्थित होते. 
राक्षसवाडी येथे सायंकाळी झालेला मशीन शुभारंभ कार्यक्रम गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे, सहा.गटविकास अधिकारी रुपचंद जगताप व भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष अभय बोरा यांचे हस्ते उद्घाटन झाले. यावेळी तालुका प्रकल्प संचालक आशिष बोरा शांतीलाल कोपनर, विजय माने, जनार्धन बराते, कांतिलाल कोपनर, धुळा महारनवर, विजय कोपनर, भाऊसाहेब शिपकुले, विजय काळे, सोनबा विटकर, राजेंद्र काळे, मुरलीधर वाघमोडे, भारत माने फाउंडेशनचे समन्वयक योगेश अभंग, बाळासाहेब बगाटे, जयदीप जगताप आदी उपस्थित होते. भारतीय जैन संघटनेचे जिल्हा समन्वयक आदेश चंगेडीया, जिल्हाध्यक्ष नवीन बोरा, यांच्या मार्गदर्शनाखाली मशिनरीचे व्यवस्थापन स्थानिक पदाधिकारी करत आहेत.