Breaking News

हंगा येथे सैनिक सेवानिवृत्त सोहळा; निलेश लंके प्रतिष्ठाणचा उपक्रम

पारनेर तालुक्यातील हंगा येथिल रहिवाशी असलेले सेवानिवृत्त जवान आप्पासाहेब साठे, संतोष रासकर, अशोक साठे हे प्रदिर्घ देश सेवेतुन सेवानिवृत्त झाल्याबद्दल निलेश लंके प्रतिष्ठाणच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात यांचा सपत्निक सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी लोकनेते निलेश लंके, जिल्हा परिषद सदस्या राणी लंके, हंगा गावच्या सरपंच नंदा शिंदे, उपसरपंच सतिष दळवी, सेवा सोसायटीचे अध्यक्ष बाबासाहेब साठे, मा. सरपंच राजेंद्र शिंदे, प्रकाश दळवी, सुदाम लोंढे, ग्रामपंचायत सदस्य रामदास साठे, बाळासाहेब शिंदे, संतोष ढवळे, बाबा नवले, भाऊ साठे, भाऊ रासकर, शुभम लोंढे, गोरक्ष नगरे, मनोहर नगरे, रविंद्र साठे, सचिन साठे आदी उपस्थित होते. यावेळी निवृत्त सैनिक संतोष रासकर यांनी बॉर्डरवर घडलेल्या थरारक घटना सांगितल्या. आप्पासाहेब साठे मेजर यांनी जवानांचे जिवन किती खडतर असते, त्यांना किती आव्हानांचा सामना करावा लागतो याचे वर्णन सांगितले. भारत मातेची सेवा करून आल्यानंतर निवृत्त सैनिक हा प्रत्येक गावात दुर्लक्षित घटक बनतो, परंतु प्रतिष्ठानच्या वतीने गावातील ग्रामस्थांसमोर केलेला इतका मोठा सन्मान प्रथमच आमच्या वाटयाला आला आहे, देशसेवा केल्याच चीज झालं असल्याचे निवृत्त सैनिक मेजर अशोक साठे यांनी सांगितले. याप्रसंगी लोकेनेते निलेश लंके यांनी देशसेवा करून आलेल्या जवानांचा सपत्निक सत्कार केला. देशसेवा केल्याबद्दल जवाणांचे ऋण व्यक्त केले. भविष्यात कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास केंव्हाही आवाज द्या मी सदैव तुमच्यासाठी हजर असेन असे आश्‍वासन लंके यांनी दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रामदास साठे यांनी केले तर आभार माजी सरपंच राजेंद्र शिंदे यांनी मानले.