Breaking News

कर्जत तालुक्यात श्रमदानाची चढाओढ


कर्जत तालुक्यातील 41 गावांत पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातुन सुरू असलेल्या वाटर कप स्पर्धेला ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. अखिल भारतीय जैन संघटना, रोटरी क्लब, डॉ.असोसिएशन, महिला संघटना, शिक्षक संघटना, तलाठी, ग्रामसेवक व कृषी विभाग यांच्या सक्रिय सहभागाने चागंलीच रंगत आली असुन श्रमदान करण्यासाठी चागंलीच चढाओढ लागली आहे. गाव कसे दुष्काळमुक्त व पाणीदार कसे करावयाचे, या बाबत जैन संघटना मार्गदर्शन करत आहे. आज तालुक्यातील कौडाणे येथे श्रमदान करण्यात आले. यावेळी प्रताधिकारी अर्चना नष्टे, तहसिलदार किरण सावंत, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, अभय बोरा, आशिष बोरा, वनविभगाचे किशोर गांगर्डे, सरपंच वैशाली जगदाने, अनिल गंगावणे, महादेव पाटील, शरद सुद्रीेेक, धनु सुद्रीक, गैातम सुद्रीक, बंडू सुर्यवंशी, हिराबाई सुद्रीक, विठ्ठल सुद्रीक, अश्रु सुद्रीक, वन मजूर विष्णू सुर्यवंशी अदींनी श्रमदान केले.