Breaking News

जि. प. बांधकाम विभागाच्या कामकाजाबद्दल कर्मचार्‍यांत तीव्र नाराजी


येथील पंचायत समिती कार्यालयातील सर्व साफसफाई बळजबरीने मैलकामगारांनकडून करून घेतली जात असल्याने जि. प. बांधकाम विभागाच्या कामकाजाबद्दल कर्मचारी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे.
कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या ताब्यात अनेक रस्ते आहेत. या रस्त्यांच्या देखभालीकडे लक्ष देण्याएैवजी बांधकाम विभाग गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे यांची मर्जी सांभाळन्यासाठी मैलकामगारांचा बेकायदेशीर वापर करत आहेत. जी कामे पंचायत समितीतील शिपायांनी करणे अपेक्षित आहेत, ती कामे दमदडपशाही करून बळजबरीने करून घेतली जात आहेत. पंचायत समिती देखील याठिकाणी असणारे शिपाई स्वच्छ करत नाहीत, केवळ अधिकारी, पदाधिकारी यांच्या दाराजवळच बसून राहतात, परंतू शिपायांची सर्व कामे मैलकामगारांकडून करून घेतली जातात.