Breaking News

राज्य कर्मचाऱ्यांचा ऑगस्टमध्ये संप


प्रलंबित मागण्यांसाठी १९ लाख राज्य सरकारी कर्मचारी येत्या ऑगस्ट महिन्यात तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नाशिक येथे झालेल्या सभेत हा निर्णय झाला असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष विश्वास काटकर आणि सरचिटणीस ग.शं. शेटे यांनी दिली आहे. तीन दिवस संप करूनही मागण्या मान्य न झाल्यास कर्मचाऱ्यांकडे बेमुदत संपाचा पर्याय खुला असेल, असा इशाराही देण्यात आला आहे. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीकडे राज्य सरकार हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचा संघटनेचा आक्षेप आहे.