Breaking News

नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या वाढदिवसानिमित्त शरिरसौष्ठवांची मांदियाळी

ज्यांनी शरीरावर प्रेम केले त्यांनी शरिर संपत्ती कमावली. आज स्वास्थ्य टिकविणे महत्त्वाचे असून शरीर संपत्ती टिकविण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. नगरसेवक अमित चिंतामणी यांचेकडून आपल्या वाढदिवसानिमित्त नेहमी सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमाद्वारे समाजाला चांगला संदेश देणार्‍या स्तुत्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. जामखेडला शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करून तरूणांना शरीरसंपत्तीचे व आरोग्याचे महत्त्व पटविण्याचा अमित चिंतामणी व बॉडी बिल्डर आसोसिएशनचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. राम शिंदे यांनी केले.

अहमदनगर डिस्ट्रिक्टबॉडी बिल्डर व फिटनेस असोसिएशन, जामखेड तालुका बॉडी बिल्डर आसोसिएशन, एसपी फिटनेस क्लबच्या संयुक्त विद्यमाने नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 4 एप्रिल रोजी ना. श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री ना. राम शिंदे बोलत होते.
यावेळी प्रसिद्ध व्यापारी मुरलिधर चिंतामणी, नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, नगरसेवक संदीप गायकवाड, बिभीषण धनवडे, गणेश आजबे, शामीर सय्यद, राजेश वाव्हळ, फिरोज कूरेशी, विकास राळेभात, शाकीर खान, निखिल घायतडक, भाऊराव राळेभात, मोहन पवार, पं.स सभापती सुभाष आव्हाड, पं.स सदस्य भगवान मुरूमकर, जि. प. सदस्य सोमनाथ पाचरणे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सलिम बागवान, तालुकाध्यक्ष रवि सुरवसे, अ‍ॅड. प्रविण सानप, बंकटराव बारवकर, काकासाहेब गर्जे, प्रविण चोरडिया, डॉ. अल्ताफ शेख, वसीम ( बिल्डर) कुरेशी, शेरखान पठाण आदी विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.