Breaking News

महाआरतीने करंदी येथील मळगंगा देवी यात्रा उत्सवास प्रारंभ


पारनेर तालुक्यातील करंदी येथील ग्रामदैवत मळगंगा देवी यात्रा उत्सवास काल पहाटे 3 वा. ग्रामस्थांच्या सामुदायिक महाआरतीने भावपुर्ण वातावरणात प्रारंभ झाला. यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन पहाटे 3 ते 11 देवीला दंडवत, शेरणी वाटप व नवसाच्या सुवासिनी भोजन दान , दु. 12 ते 4 काठ्याची भव्य मिरवणुक, सायंकाळी 7 ते 10 देवीची पालखी छबीना मिरवणुक, व रात्री 10 ते 1 वाजेपर्यंत यात्रेसाठी आलेल्या पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी लोक नाट्य तमाशाचा कार्यक्रम. तर आज महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या उपस्थित कुस्त्यांचा भव्य हगाम्याचे आयोजन करण्यात आले आहे. चैत्र पौर्णिमेला पैठण येथुन आणलेल्या गंगाजलाने देवीला मंगल स्नान करून हळद लावली जाते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी मांडव डहाळे व ग्राम प्रदक्षिणा पारंपारिक वाद्याच्या गजरात घेतली जाते. देवीला हळद लागल्यानंतर सलग पाच दिवस सर्व ग्रामस्थ शेतीची सर्व कामे बंद ठेवून ग्रामदैवताच्या यात्रा उत्सवात सहभाग घेतात. मुंबई, पुणे, गुजरात व बाहेरगावी असणारे ग्रामस्थही यात्रेनिमित्त कुलधर्म कुलाचार करून ग्रामदैवताचे आशिर्वाद घेतात. तरी परिसरातील भाविकानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामस्थांचा वतीने करण्यात आले आहे.