Breaking News

पिंप्रीशहाली ग्रामपंचायतच्या सरपंचपदी रेखा कदम तर उपसरपंच पदी अमोल ठोंबळ


नेवासा ( शहर प्रतिनिधी ) - पिंप्रीशहाली ग्रामपंचायत सरपंचपदी रेखा कदम तर उपसरपंच पदी अमोल ठोबंळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. तालुक्यातील पिंप्रीशहाली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच हिराबाई खंडागळे व उपसरपंच नानाभाऊ नवथर यांचा फिरत्या निर्णयानुसार अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. नविन पदाधिकारी निवडीसाठी सर्व सदस्यांची बैठक होऊन या बैठकीत सरपंच म्हणुन रेखा कदम तर उपसरपंचपदी अमोल ठोंबळ यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे. या बैठकीस सेवा संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब नवथर, उपाध्यक्ष साहेबराव पवार, नानाभाऊ नवथर, ग्रामसेवक संजय खरड आदि उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचीत सरपंच व उपसरपंच याचा सत्कार करण्यात आला.