Breaking News

दोन दिवसीय व्याख्यानमालेत व्यक्तीमत्व विकासावर मार्गदर्शन


राहाता / प्रतिनिधी । मनशक्ति लोणावळा केंद्र प्रेरित किलबिल पालवी परिवार आयोजित व्यक्तीमत्व विकास व इतर विषयावरील पालक व मुलांचे दृष्टीने महत्वपूर्ण असलेली दोन दिवसीय व्याख्यानमाला शहरात नुकतीच संपन्न झाली. दोन दिवस चाललेल्या या व्याख्यानमालेत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले मनशक्ति साधक डॉ. मनीष शिंदे व शोभा अवटी यांनी व्यक्तिमत्व विकास, बुद्धिवर्धन, गर्भ संस्कार सुप्रजनन, बालसमस्या आणि पालकत्व या विषयांवर अभ्यास पूर्ण मार्गदर्शन केले. मनशक्ति साधक भालचंद्र आवटे, बाबूराव टीळेकर, अविनाश कोतवाल, मुकुंद जोशी, रजनी जोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते तरुण मुले आणि मुली, 8 ते 14 वयोगटातील मुले व पालकांसाठी या व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास डॉ. स्वाती म्हस्के, प्रा. सागर कुलकर्णी, डॉ. श्रुती धनेश्‍वर, प्रा. सुनीता जैन, डॉ. भारत सुंडाळे, नंदकिशोर लुटे, कल्याणी देशपांडे उपस्थित होते.