Breaking News

खंडणीसाठी मित्राचा खून; तिघांना जन्मठेप


मित्राचे एक कोटी रूपयांच्या खंडणीसाठी अपहरण करत खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी तिघांना येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. डी. पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याबाबत अधिक माहिती अशी : गणेश गोरक्षनाथ चांदगुडे (रा. चासनळी, ता. कोपरगाव) हा वडिल वारल्यामुळे मामा सुनील सिताराम दौंड (रा.मातापूर, ता. श्रीरामपूर) यांच्याकडे राहण्यासाठी आला होता. येथील बोरावके महाविद्यालयात तो बारावीचे शिक्षण घेत होता. दि. १२ मार्च २०१५ रोजी त्याचे मित्र अजय दिनकर मोरे, धीरज शंकर शिंदे (दोघे रा. श्रीरामपूर), व पराग मच्छिंद्र पटारे (रा. कारेगाव) या तिघांनी त्याला पळवून नेले होते. त्यानंतर त्याच्या आईच्या मोबाइलवर मॅसेज व संपर्क साधून एक कोटी रूपयांच्या खंडणीची मागणी केली होती. मात्र, आरोपींनी गणेशचा दगडाने ठेचून खून केला व मृतदेहावर रॉकेल टाकून पेटवून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. .