Breaking News

रत्नागिरी जिल्ह्यात आठ वर्षांत 77 बिबट्यांचा मृत्यू


रत्नागिरी, दि. 29, एप्रिल - वाढत्या जंगलतोडीमुळे वन्य प्राण्यांचा अधिवास नष्ट होत असून अन्य वन्य प्राण्यांबरोबरच बिबट्यांचे मानवी वस्तीत घुसण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यातून बिबट्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठ वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात 77 बिबट्यांचा विविध कारणांनी मृत्यू झाला असून 64 बिबट्यांना जीवदान देण्यात वन विभागाला यश आले आहे.

सन 2010 ते मार्च 2018 या आठ वर्षांत जिल्ह्यात 136 बिबटे सापडले. तालुकानिहाय आकडेवारीनुसार चिपळूण तालुक्यात 10 बिबटे मृतावस्थेत सापडले. तर तीन बिबट्यांना नैसर्गिक अ धिवासात सोडण्यात आले. गुहागर तालुक्यात चार बिबटे मृतावस्थेत सापडले तर चौघांना सुखरूप सोडण्यात आले. संगमेश्‍वकर तालुक्यात 12 बिबट्यांचा मृत्यू झाला तर 13 बिबटे नैसर्गिक अ धिवासात सोडण्यात आले. लांजा तालुक्यात 10 बिबटे मृतावस्थेत सापडले तर 8 बिबट्यांना जिवंत सोडण्यात यश आले. राजापूर तालुक्यात सर्वाधिक 14 बिबट्यांचा मृत्यू झाला आणि सर्वाधिक 20 बिबटे नैसर्गिक अधिवसात सोडण्यात आले. रत्नागिरीत 16 बिबटे मृतावस्थेत आढळले तर 8 बिबट्यांना जंगलात सोडण्यात आले. दापोलीत 4 बिबटे मृत झाले, तर 5 बिबट्यांची सुटका क रण्यात आली. खेडमध्ये 6 बिबटे मृतावस्थेत सापडले तर 2 बिबट्यांना जंगलात सोडण्यात यश आले. मंडणगड तालुक्यात 10 वर्षांत केवळ 1 बिबट्या मृतावस्थेत सापडला तर एकाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. अधिवासाचा आणि भक्ष्याचा प्रश्‍ने असल्याने बिबटे मानवी वस्तीत घुसतात. त्यातून भक्ष्याचा पाठलाग करताना बिबटे विहिरीत पडतात. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात 10 ठिकाणी बिबटे विहिरीत पडले.

जिल्ह्यात फासकी लावण्याचे प्रमाणही मोठे आहे. तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून फासकी लावणार्याांवर कारवाईची तरतूद करण्यात आली होती. मात्र अपवाद वगळता कोठेही कारवाई झाली नाही. फासकी डुकरासाठी लावली जाते. मात्र त्यात बिबटे अडकतात. ते गंभीर जखमी होतात, वेळीच सुटका झाली नाही, तर त्यांचा मृत्यू होतो. याशिवाय वाहनांची धडक, उपासमार, विषबाधा अशी काही प्रमुख कारणेही बिबट्यांच्या मृत्यूस जबाबदार आहेत. वाढत्या उष्णतेमुळे जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत कमी झाले आहेत. अशा वेळी पाण्यासाठी वणवण करणारे प्राणी मानवी वस्तीत येतात आणि फसतात. त्यातूनही बिबट्यासह अन्य प्राण्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.