Breaking News

धुळ्यात पारा 44 अंशावर; उकाड्याने नागरिक हैराण


दि. 29, एप्रिल - धुळे जिल्ह्यात ब-याच ठिकाणी अंग भाजून काढणारे उन्ह पडत आहे. शनिवारी पारा 44अंशापर्यंत पोहचल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे.


गेल्या काही दिवसापासून वातावरणात बदल होऊन तापमानात अचानक वाढ झाली आहे. कमाल तापमान 44 अंश सेल्सीअस वर जाऊन पोहचले आहे. पारा 44 अंशावर गेल्यामुळे अंगाला अक्षरक्ष: चटके बसत आहेत. त्यामुळे धुळेकरांना वैशाख वणवाचा अनुभव येत आहे.