Breaking News

मागासवर्गीयांच्या विविध रिपब्लिकन पक्षाचा 2 मे रोजी मोर्चा


मुंबई, दि. 29, एप्रिल - मागासवर्गीयांच्या विविध प्रश्‍नांसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे येत्या दि 2 मे रोजी राज्यभरातील प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आला असून या मोर्चात रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने सामील होण्याचे आवाहन रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. भिमाकोरेगाव प्रकरणी षडयंत्र रचणार्‍या आरोपींना अटक झाली पाहिजे. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही.त्यामुळे जर संभाजी भिडे यांचा या षडयंत्रात हात असेल तर त्यांनाही मिलिंद एकबोटे प्रमाणे अटक करा. भिमाकोरेगाव हिंसाचाराची प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या पूजा सुरेश सकट हिची हत्याच झाली असून मारेकर्‍यांवर कलम 302 अन्वये खुनाचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे. भिमाकोरेगाव प्रकरणी झालेल्या महाराष्ट्र बंद मधील आंदोलकांवरील खटले काढून घेण्यात यावेत. 

ऍट्रॉसिटी कायद्याला धक्का लागता कामा नये. एट्रॉसिटी कायद्यात कोणताही बदल न करता या कायद्याचे संपूर्ण संरक्षण झालेच पाहिजे. ऍट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर दलित व आ दिवासिंविरुद्ध कलम 395 नुसार दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल करणार्‍यांवरही कठोर कारवाई झालीच पाहिजे. मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी लवकर संसदेत क ायदा करा. अनुसूचित जाती जमाती; ओबीसी व भटक्या विमुक्तांच्या आरक्षणाची काटेकोरपणे अंमलबजावणी झालीच पाहिजे. जम्मू काश्मीर मधील कठुआ, उत्तर प्रदेश मधील उन्नाव तसेच देशभरातील अनेक ठिकाणी अल्पवयिन मुलींवर बलात्कार करून त्यांची क्रूर हत्या करणार्‍यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. दलित, अल्पसंख्यांक व महिलांवर अत्याचार करणार्‍यांवर कठोर क ारवाई झालीच पाहिजे. या मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे येत्या दि 2 मे रोजी राज्यभरातील जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. दि 2 मे रोजी मुंबईत बांद्रा येथे जिल्हा अधिकारी कार्यलयावर रिपाइं मुंबई प्रदेश आणि ठाणे प्रदेश तर्फे काढण्यात येणार्‍या मोर्चाचे नेतृत्व रामदास आठवले स्वतः करणार आहेत.